पुणे महानगरपालिका भरती: कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली! नवीन तारीख लवकरच! | PMC Junior Engineer Exam Postponed 2025

ब्रेकिंग न्यूज! पुणे महानगरपालिका (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची बहुप्रतिक्षित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ती स्थगित करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून येत्या दोन-तीन दिवसांत परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 169 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरू केली होती. या 169 जागांसाठी तब्बल 42 हजार अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, केवळ पुणे शहरातूनच साडेआठ हजार अर्ज आले नसून छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर यांसारख्या विविध शहरांमधूनही उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा मोठी चुरशीची होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 डिसेंबर रोजी 20 शहरांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, 2 डिसेंबर रोजी राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. कारण, अनेक कर्मचाऱ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते आणि त्यांना मतदानामुळे परीक्षा देणे शक्य होणार नव्हते. यासंदर्भात उमेदवारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. याची दखल घेत महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड: परीक्षेसाठी प्रवेशपत्र आवश्यक आहे. परीक्षा केंद्र आणि वेळ स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. उमेदवारांना परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर SMS/Email द्वारे युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) पाठवण्यात येईल. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment आणि https://www.pmc.gov.in/en/b/recruitment या लिंकवरून उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. काही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800222366, 18001034566 किंवा हेल्पलाईन लिंक http://cgrs.ibps.in वर संपर्क साधावा. प्रवेशपत्र आणि सूचनांनुसार फोटो असलेले ओळखपत्र नसल्यास परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नवीन जाहिरात लवकरच: महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-3 या पदांसाठी नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. एकूण 169 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा घेणारी संस्था आयबीपीएसकडील काही तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे.

याआधी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या 27,879 उमेदवारांपैकी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्याचबरोबर, जातीचा प्रवर्ग दुरुस्त करण्याची संधी देखील उमेदवारांना देण्यात आली होती. सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना 12 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, ज्याचा 4,419 उमेदवारांनी लाभ घेतला.

महापालिकेतील 100 कनिष्ठ अभियंत्यांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय झाल्याने ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी 100 कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, त्यावेळी मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यानंतर राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरभरतीत सामावून घेण्याचा अध्यादेश काढल्याने महापालिकेने ही प्रक्रिया थांबवली होती.

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महापालिकेकडून थांबवण्यात आलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रियेचे नियोजन करण्याबाबत महापालिकेने चर्चा केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा आदेश आहे. त्यामुळे अभियंता भरतीची नव्याने जाहिरात काढण्याची तयारी सुरू आहे. 15 जानेवारीपर्यंत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका भरती 2025 – महत्वाच्या लिंक्स:

पुणे महानगर पालिका भरती अपेक्षित प्रश्नसंच: लवकरच उपलब्ध

पुणे महानगरपालिका भरती 2025 परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम डाउनलोड करा: लवकरच उपलब्ध

PMC Admit Card 2025 Download: पुणे महानगरपालिका (PMC) भरती 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. अंदाजानुसार, परीक्षा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. PMC भरती परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र डिसेंबर 2025 च्या सुरुवातीला जाहीर केले जातील. उमेदवारांना त्यांचे नाव, रोल नंबर, वडिलांचे नाव, परीक्षा वेळ आणि केंद्र याबद्दल माहिती प्रवेशपत्रावर मिळेल. प्रवेशपत्राची प्रिंट काढणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी नियमितपणे हे पेज तपासा.

PMC Hall Ticket 2025 कसे डाउनलोड करावे:

  1. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/ वर जा.
  2. वेबसाईटवर “Admit Card” लिंकवर क्लिक करा.
  3. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्यावर क्लिक करा.
  4. आवश्यक माहिती (Registration ID, DOB) भरा.
  5. प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top