1000+ Marathi Suvichar: आयुष्यात बदल घडवणारे प्रेरणादायी विचार! | Marathi Suvichar Collection

Marathi Suvichar – तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 1000 हून अधिक प्रेरणादायी मराठी सुविचार! हे सुविचार तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील, तुमच्या विचारांना अधिक सकारात्मक बनवतील आणि तुम्हाला एक उत्तम व्यक्ती बनण्यास मदत करतील. हे सुविचार वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता.

चांगले विचार आणि सुविचार हे आपल्याला नेहमी सकारात्मक राहण्याचा मार्ग दाखवतात. ते आपल्या विचारांना योग्य आकार देतात. ज्या व्यक्तीच्या विचारांचा पाया भक्कम असतो, ती व्यक्ती नेहमी सकारात्मक असते आणि अशा व्यक्तीच्या सोबत राहायला सगळ्यांनाच आवडते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुविचार (Marathi Suvichar) आपल्या जीवनात योग्य मार्ग निवडायला मदत करतात. जेव्हा आपण निराश होतो, तेव्हा हे सुविचार आपल्याला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि आयुष्याला योग्य दिशा देणारे सुविचार घेऊन आलो आहोत. हे सुविचार तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना तसेच प्रियजनांना पाठवून त्यांनाही प्रेरित करू शकता.

टेबल ऑफ कंटेंट्स (Table of Contents)

  • Marathi Suvichar
  • सुंदर मराठी सुविचार
  • Anmol Suvichar in Marathi
  • Marathi Suvichar on Life
  • Positive Suvichar
  • Marathi Suvichar Status
  • सुविचार मराठी छोटे
  • शालेय सुविचार मराठी
  • Marathi Suvichar Sangrah
  • चांगले सुविचार
  • 100 मराठी सुविचार
  • Marathi Suvichar New
  • आत्मविश्वास सुविचार मराठी
  • Marathi Suvichar Short
  • Marathi Suvichar on Life
  • Marathi Suvichar Quotes
  • Marathi Suvichar Students
  • Marathi Suvichar SMS
  • Marathi Suvichar Small/Chhote
  • Marathi Suvichar for Whatsapp
  • समारोप

Marathi Suvichar:

नेहमी मोठे ध्येय ठेवा, आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता सोडत नाही.

आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, दुःखी राहिल्याने उद्याच्या समस्या सुटणार नाहीत, उलट आजचा आनंदही हिरावून घेतला जाईल.

जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी, चांगले वागणे सोडू नका, विजय नेहमी सत्याचाच होतो.

दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच, संयम ठेवा…

आयुष्यातला खरा आनंद हा भावनांच्या ओलाव्यात असतो, आणि जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणे म्हणजे शिक्षण.

जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.

काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जी माणसे आपला विचार बदलू शकत नाहीत, ती आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.

वाया घालवलेला वेळ आपले भविष्य बिघडवतो.

नेहमी तयार राहा, बेसावध आयुष्य जगू नका.

वागण्यात खोटेपणा नसेल, तर मोठेपणा लवकर मिळवता येतो.

कुणालाही कमी समजू नका, ज्याला तुम्ही काच समजता, तो हिरासुद्धा असू शकतो.

कष्ट ही एक अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे सुद्धा उघडते.

प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो, तीच माणसं आपल्यापासून दूर जातात.

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात! मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून, दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

संकटं टाळणं माणसाच्या हातात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे, त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही, त्या विषयी मौन पाळा.

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे.

अन्याय करणे हे पाप आहे, आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप!

केवळ चुकल्याने नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात, म्हणून बोलत चला.

टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा, दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील.

जिथे प्रेम आहे, तेथे जीवन आहे.

अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे, म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा (तुम्ही वाचक) एकदाच भेटतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे, जी कितीही मिळाली तरी, माणसाची तहान भागत नाही.

सुंदर मराठी सुविचार:

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे, उद्या ते नसूही शकते.

खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपण विजयाच्या जवळ आलो.

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात.

नातं तेव्हाच तोडा, जेव्हा समोरच्यालासुद्धा ते नको असेल.

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल.

इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.

अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

“मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे..

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.

अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही, आणि विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल, तर नोटा मोजू नका, कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

नेहमीच लहान बनून राहा, प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ, स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा, दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

थोडे दुःख सहन करून, दुसऱ्याला सुख मिळत असेल तर, आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

Anmol Suvichar in Marathi:

नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.

मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.

माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.

माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य…! कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण ते जेव्हा दिसतात, तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे, जी कितीही मिळाली तरी, माणसाची तहान भागत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

आपली खरी स्वप्न तीच आहेत, जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

माझ्या खिशाला होल काय पडला पैशा पेक्षा जास्त तर नाती गळून पडली…

संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो, तोच जगाला बदलत असतो, ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे, सूर्य म्हणून तोच चमकला आहे.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव!

समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.

कुणी तरी फार छान म्हटलं आहे, जीवनात घाबरून का जातो दुःखाने, जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

घाबरटाला सारेच अशक्य असते.

शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही विसरत.

विज्ञानाचं तंत्र शिका पण, जगण्याचा मंत्र हरवू नका.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

बिंदास हसावं दुःख काय आहे, जीवनात कुणाला टेंशन कमी आहे. चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

जीवन हसत-हसत जगावं, प्रेम आणि आनंद मिळत राहावं, नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.

जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात, एकतर जिंकतात किंवा शिकतात.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

हसा आणि हसवत राहावं, प्रत्येकाने आनंदात रहा, माझी आठवण नाही काढली तरी चालेल मात्र रोज तुमची आठवण काढणार.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

Marathi Suvichar on Life:

इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल, मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते, कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्हावं म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.

सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा. ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा. एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

जी लोकं सरळ मनात उतरतात, त्यांना सांभाळून ठेवा. आणि जी मनातून उतरतात, त्यांच्यापासून सावध रहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका, त्यामधून काहीतरी चांगले मिळवाच.

तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की, ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.

भेकड म्हणून जगण्यापेक्षा, शुराचे मरण कधीही चांगले.

अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता, यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते.

थेंब कितीही लहान असला तरी, त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

मोत्याच्या हारापेक्षा, घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

मरण जवळ आलं म्हणून, जगायचं कुणी थांबतं का!

आयुष्य पूर्ण शून्य झाल, तरी हार मानू नका, कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे, ती ताकद तुमच्या हातात आहे.

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही, तर स्वतःला घडवण्यात आहे.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं.

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.

जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!

आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कामात आनंद निर्माण केला की, त्याचं ओझं वाटत नाही.

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं जरूर…

जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये, कारण चांगले लोकं आनंद देतात आणि वाईट लोकं अनुभव.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.

अपयश मिळणं ही शोकांतिका नाही तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात.

कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.

यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही.

दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणूनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे… जो राजवाड्यात जेवढी चव देतो, तेवढीच चव झोपडीत पण देतो.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

मुर्खांच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच आहे.

सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

तुमच्यावर किती लोकं विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

Positive Suvichar:

प्रयत्न करणे कधीच सोडू नका, गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.

कपडे नाही, माणसाचे विचार Branded असले पाहिजे.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

माणसाला त्याचे श्रेष्ठत्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते.

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

जीवन जगण्याचे दोन नियम. पहिला फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.

वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे.

जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.

झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो.

जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल, तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल.

कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल तेवढे सोबती कमी होतील.

लहान तळ्यासारखे गोड रहा, जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात.

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.

जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोकं साथ देतात तर वाईट लोकं अनुभव देतात.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात.

फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये?

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते!

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

स्वतःला प्रकाशमान करायचे असेल तर सतत चमकत राहिले पाहिजे.

ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

मनासारखं यश त्यांनाच मिळत, ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांच ध्येय असतं.

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.

Marathi Suvichar Status:

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं? हे महत्त्वाचं नाही. उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.

आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते.

भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही तर जीवन थांबवते.

यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी देऊ नका.

यश मिळवणे सोपे असते, तर प्रत्येकानेच ते मिळविले असते.

ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल.

जे कारणे देण्यात तरबेज असतात ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात.

माघार कधीच घेऊ नका आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा.

काही सोडायचंच असेल तर तुमच्यातील भीती सोडा, राग सोडा.

जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याच अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय.

काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा.

दररोज स्वतःमध्ये छोट्या-छोट्या सुधारणा करत गेल्यास, मोठं यश लवकरच मिळते.

जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.

दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि सुखात सुख वाटायला हवं.

रडल्याने जर दुःख टळलं असतं तर या जगात कुणीच दुःखी नसतं.

तू बदलली, मी बदललो, हसण्यामागील कारणे बदलली पण रडण्यामागील कारण अजूनही तूच आहेस.

तू नसल्याची फक्त एकच खंत आहे, कितीही हसलं तरी डोळ्यात अश्रू हे येतातच.

कुणीतरी विचारलं प्रेम केलं होतं का कधी, मी म्हटलं अजूनही करत आहे.

अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा.

जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचं आहे, तर थांबू नका. ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत रहा.

अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका तर आजपर्यंत प्रयत्न न करता गमावलेल्या संधींचा विचार करा.

लोक, आपण करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच थांबू नका.

एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुल, फळ येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते. यश मिळण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न करत रहा.

तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही आणि तुम्ही शिकला नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही.

आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा, एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच, तेच शोधा.

यशस्वी लोकं ते नसतात जे कधीच अपयशी झाले नाहीत तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही, ते असतात.

तुमचा स्वतः विश्वास नसेल तर लोकांचा तरी तुमच्यावर कसा विश्वास बसेल?

आधी तुमचे विचार बदला मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात त्यानुसारच तुम्हाला यश मिळते.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील ३ गोष्टी ओळखेल. हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत रहाण्यामागील कारण.

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

सुविचार मराठी छोटे:

माणूस कितीही महत्वाकांक्षी असला तरी त्याला परिस्थिती समोर झुकाव लागत.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसतात.

तलवार ही शौर्याची नव्हे; भीतीची निशाणी आहे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

जेंव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसते, तेंव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.

चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.

एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

गरूडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही, केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.

कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जीभेची आहे जिला फक्त गोडच आवडते.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच.

काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप! कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

तुम्ही वाघासार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top