नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमाशुल्क विभागात कस्टम आयुक्त कार्यालय, मुंबईने गट ‘क’ मधील (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या भरतीमध्ये सीमन आणि ग्रीझर या पदांचा समावेश असून एकूण 44 पदे भरण्यात येणार आहेत.जर तुमची शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असेल आणि तुम्ही मुंबईत सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर आजच अर्ज करा!
या पदभरती अंतर्गत सीमन, ग्रीझरची 44 पदे भरण्यात येणार असून वेतन दरमहा 18,000 ते 56,900 रुपये देण्यात येणार आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण किंवा
समतुल्य असणे आवश्यक आहे.वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असुन (SC/ST/OBC श्रेणीतील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट) देण्यात आलेली आहे.
अर्ज प्रक्रिया:
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल. अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक 17 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत पाठवावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001
अर्ज करण्याचे नियम व अटी:
- आरक्षित पदांसाठी प्रमाणपत्रे : आरक्षित श्रेणीतील उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रे विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज भरताना काळजी:अर्जामध्ये भरलेली श्रेणी व कागदपत्रांची पडताळणी करताना प्रमाणपत्रांची साक्षांकीत नोंद अनिवार्य आहे. अपूर्ण कागदपत्रे असल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
- संपर्क माध्यम : अर्ज प्रक्रिया आणि पडताळणीसाठी कोणतेही स्पष्टीकरण पोस्ट, फॅक्स, ईमेल इत्यादी स्वरूपात मान्य केले जाणार नाही.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.