नमस्कार मित्रांनो उत्तर पश्चिम रेल्वे विभागाने 1791 पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. या पदभरती अंतर्गत विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, कारपेंटर, पाईप फिटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, वेल्डर इत्यादी पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज भरावा. चला तर जाणून घेऊया या पदभरतीबद्दल संपूर्ण माहिती.
पदांची माहिती:
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Apprentice)
पदांची संख्या – एकूण 1791
शैक्षणिक पात्रता:
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावे तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
वयोमर्यादा – 10 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट आहे.
अर्ज शुल्क:
सामान्य/ओबीसी प्रवर्ग – रु. 100/-
SC/ST/महिला/अपंग प्रवर्ग – शुल्क माफ
अर्ज प्रक्रिया:
पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://rrcactapp.in/ वर जाऊन दि. 10 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी:
तपशीलवार माहिती आणि इतर अटी-शर्तींसाठी खालील अधिकृत जाहीरात पहा:
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.