Wipro Careers:IT कंपनी Wipro 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांसाठी त्वरित होणार भरती! यांनी आखला मेगा प्लॅन!

wipro careers bharti 2024 notification

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बेरोजगारी कमी व्हावी म्हणून विप्रो अंतर्गत  10,000 ते 12,000 नवीन कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. असे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविंद यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाई परिषदेदरम्यान सांगितले आहे. बेरोजगारीचा प्रश्न हा गंभीर होत आहे त्यामुळे प्रसिद्ध कंपनी Wipro ने 2025 साठी 10,000 ते 12,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पद भरती चा मेगा प्लॅन आखला आहे.IT कंपनी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

मित्रांनो गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने कपात करण्यात आलेली आहे. परंतु अचानक आता 2025 च्या नवीन आर्थिक वर्ष मध्ये 10 ते 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असे सांगितले आहे कारण 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2025 च्या या आर्थिक वर्षासाठी ही पद भरती होणार असून या प्लॅन नुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती कॅम्पसच्या माध्यमातून आणि तसेच कॅम्पस शिवाय देखील उमेदवारांना निवडण्यात येणार आहे. कंपनीचा युटीलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असून त्यामुळे आमचा पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि ही त्यासाठी योग्य वेळ आहे असे गोविल यांनी सांगितले आहे. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

आम्ही मागील वर्षी जेवढी नोकर भरती केली तेवढीच 2025 वर्षीही करण्यात येणार आहे आणि यासाठी आम्ही 2025 मध्ये सर्व जॉब ऑफर पूर्ण करायच्या प्रक्रियेत आहोत आणि तसेच आम्ही काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूतही केली आहे व  यावर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पस बाहेर भरती करू असे सौरभ गोविंद 19 जुलै रोजी कंपनीच्या कमाई परिषदेदरम्यान म्हणाले आहे.

विप्रो किती नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे?

विप्रो २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी १०,००० ते १२,००० नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्लॅन आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विप्रोने कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली होती का?

होय, गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये विप्रोने सलग कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली होती.

विप्रो नव्या कर्मचाऱ्यांची भरती कशी करणार आहे?

विप्रो कॅम्पस 

आणि कॅम्पसबाहेर दोन्ही ठिकाणी भरती करणार आहे.

पहिल्या तिमाहीत विप्रोने किती नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली?

३० जून २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत विप्रोने ३००० हून अधिक नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली.

विप्रो इतक्या मोठ्या संख्येने नव्या कर्मचाऱ्यांची भरती का करत आहे?

विप्रोचा युटिलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असल्याने पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे.

विप्रो करिअर्सबद्दल अधिक माहिती कोठे मिळेल? विप्रो करिअर्सबद्दल अधिक माहितीसाठी विप्रोची अधिकृत वेबसाइट पहा.

अधिक माहितीसाठी पहा –

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा –येथे क्लिक करा 

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net