Lakhapati Didi Yojana 2024: लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पाच लाख रुपये!2 कोटी महिलांना मिळणार लाभ

केंद्र सरकारची लखपती दीदी योजना ही महिलांसाठी एक नवीन संधी घेऊन आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक लाख ते पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. चला तर बघुयात केंद्र सरकारची लखपती दीदी योजना नेमकी काय आहे तर..

या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला असून अनेक महिलांना या योजनेचा लाभ ही मिळाला आहे जिल्ह्यातील अकरा लाख महिलांना या योजनेचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम एक ते पाच लाख रुपये इतकी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोण घेऊ शकते लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बचत गटात नाव नोंदवलेले असणे गरजेचे आहे व तसेच अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.

लखपती दीदी योजनेचे उद्देश पुढील प्रमाणे आहे:

महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे.
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे.
महिलांच्या कौशल्यांचा विकास करणे.
लघु उद्योगांना चालना देणे.

लखपती दीदी योजना FAQs

लखपती योजना नेमकी काय आहे?

लखपती दीदी योजना ही केंद्रशास सरकारचे महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. यामुळे महिलांना स्वतःचे उद्योग सुरू करून आत्मनिर्भर बनण्यास मदत होणार आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळेल?

या योजनेचा लाभ राज्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या आणि बचत गटात सहभागी असणाऱ्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

महिला राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.महिला बचत गटात सहभागी असणे आवश्यक आहे.वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी किती निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे?

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले जाणार आहे.


🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.


Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net