CM Vayoshri Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पाच मिनिटात करा अर्ज! अगदी सोप्या पद्धतीने येथे!

CM Vayoshri Yojana 2024

नमस्कार, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना दहाहजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. त्याचबरोबर आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठीही वयोश्री योजनेची घोषणा केली आहे.या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचा लाभ 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत मुख्यमंत्री व वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना लगेचच अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन( vayoshri yojana form online apply) पद्धतीने अर्ज करायचा असून अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

या योजनेसाठी त्वरित अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी ऑनलाइन लिंक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. या योजनेसाठीचा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे देखील सादर करता येतो. आणि अर्ज(vayoshri yojana online form) केल्यानंतर अजून एका अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर ही कागदपत्रे पाठवावी लागणार आहेत.

31 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवाराचे वय 65 वर्ष आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे तेच उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. आणि ज्या उमेदवाराचे उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत आहे, तेही या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे: राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स,

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचा दाखला , उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, साहित्याबाबतचे स्वयंघोषणापत्र आणि अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ही सर्व कागदपत्रे असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Vayoshri Yojana Application Form:

☑️ अर्जाची लिंक: येथे क्लिक करा

☑️ नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

☑️ नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Faqs:

1.मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

ही योजना महाराष्ट्रातील 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत आणि साहाय्य साधने पुरवण्यासाठी राबवण्यात आली आहे.

2.या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे वय पूर्ण केलेले महाराष्ट्रातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक.

3.या योजनेत मिळणारी मदत काय आहे?

₹3000 थेट बँक खात्यात जमा.चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, वॉकर, इत्यादींसारखी निवडक साहाय्य साधने खरेदीसाठी आर्थिक मदत.

4.अर्ज कसा करायचा?

तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज या लिंकवरून अर्ज करू शकता.तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्जही करू शकता.

5.आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेल्याची पावती.पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक..उत्पन्नाचा दाखला (जर उपलब्ध असल्यास).उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र.निवडलेल्या साहित्यासाठी स्वयंघोषणापत्र (जर साहित्य खरेदी करायचे असेल तर).

6.अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अधिक माहितीसाठी, कृपया समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा.

7. अधिक माहिती कुठून मिळेल?

तुम्ही समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://sjsa.maharashtra.gov.in/en
तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

8. मला या योजनेबद्दल काही प्रश्न आहेत. मी कुठे संपर्क साधू शकतो?

तुम्ही तुमच्या प्रश्नांसह समाज कल्याण विभागाशी  संपर्क साधू शकता.

9. मी ज्येष्ठ नागरिक नाही, पण मला या योजनेबद्दल माहिती हवी आहे. मी काय करू शकतो?

तुम्ही समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकता

10.ही योजना केव्हा सुरू झाली?

ही योजना 2024 मद्ये सुरू झाली

Leave a Comment