CM Ladki Bahin Yojana Scheme :-माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेची घोषणा केल्यापासून आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. आणि काहीच दिवसात महिला खात्यात पैसे ही जमा होणार आहेत पण तत्पूर्वी महिलांना धक्का देणारी बातमी म्हणजेच, ज्या महिलांनी मराठीतून अर्ज भरले आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मात्र सरकारने याबद्दल एक मोठा निर्णय घेऊन महिलांना मोठा दिलासा दिला आहे
शासनाचे आश्वासन:
लाडकी बहीण योजनेच्या घोषणेपासून शासनाने योजनेच्या अर्जामध्ये रोज नवनवीन बदल करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे महिला वर्गात या योजनेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला वर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खाते मध्ये दीड हजार ते 3 हजार रुपये जमा केले जाई. असे आश्वासन केले आहे.
मराठीमध्ये भरलेल्या लाखो अर्जांचा काय होणार?
मराठी मधून केलेले अर्ज रद्द होणार नाहीत असे मत तटकरे यांनी मांडले आहे त्यामुळे महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही.