सर्व महीला वर्गा करीता एक आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच 3 जुलै 2024 पासून नारीशक्ती दूत ही ॲप( nari shakti doot login)प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आली असून लाखोंच्या संख्येत डाऊनलोड्स झाले आहेत. परंतु हे ॲप डाऊनलोड करताना जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना डाऊनलोड करताना एररही येत आहेत. व अनेक मंडळींना या ॲपचा हेल्पलाइन नंबर आहे(Nari Shakti doot app) हवा आहे. महत्पत्वाचं म्हणजे सर्व जनतेला निराशेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच आम्ही फॉर्म भरण्याच्या पूर्ण स्टेप्स या लेखामध्ये देत आहोत. आणि तुम्हाला कळविण्यात आनंद होतो की या योजनेसाठी अर्ज भरण्याचे संपूर्ण प्रक्रिया ही मोफत आहे.
👉 नवनवीन अपडेट करता आणि नेहमी अपडेट राहण्याकरता लगेच जॉईन करा = येथे क्लिक करा⬅️
तर चला तर बघूया आता Nari doot Application form Registration Login कसं करायचं आहे तर,
Play Store अँप डाउनलोड करणे(Downloading the app)
तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेलं नारीशक्ती दूध नावाचं ॲप किंवा गुगल प्ले स्टोअर वरून ऑफिशियल डाऊनलोड किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करायचे आहे. आणि त्यानंतर इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर पुढे application विषयीची माहिती तुम्हाला दिली असणार आहे.
Telegram group मध्ये जॉईन व्हा
अँप डाउनलोड करा: येथे क्लिक करा.(nari shakti doot portal)
इतर सविस्तर माहिती करिता येथे क्लिक करा
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करन्याच्या संपूर्ण स्टेप्स:
1️⃣ॲप डाऊनलोड करा:Google Play Store वरून “Nari Shakti Doot” शोधा आणि विनामूल्य डाउनलोड करा.
2️⃣नोंदणी करा: आपला मोबाईल नंबर नोंदवा आणि OTP द्वारे सत्यापित करा.
3️⃣वैयक्तिक माहिती द्या: नाव, जन्म तारीख, पत्ता, संपर्क माहिती इत्यादी.
4️⃣आर्थिक माहिती द्या: शिक्षण, उत्पन्न, वैवाहिक स्थिती इत्यादी.
5️⃣कागदपत्रे अपलोड करा: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि फोटो.
6️⃣अर्ज सबमिट करा: सर्व माहिती आणि कागदपत्रे सत्यापित करा आणि सबमिट करा.
7️⃣अर्जाची स्थिती तपासा: ॲप किंवा वेबसाइटवरून आपल्या अर्जाची स्थिती तपासा.
8️⃣मदत मिळवा: Nari Shakti Doot हेल्पलाइन किंवा वेबसाइटवरून संपर्क साधा.
Nari Shakti Doot App FAQ’s (मराठी)
नारी शक्ती दूत ॲप काय आहे?
हे ॲप महाराष्ट्र सरकारने विकसित केलेले आहे जे माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देत आहे.
2. मी ॲप कसे डाउनलोड करू शकते?
आपण ॲप Google Play Store वरून मोफत डाउनलोड करू शकता. ॲप शोधण्यासाठी “Nari Shakti Doot” टाइप करा.
ॲप वापरण्यासाठी मला काय आवश्यक आहे?
काय वापरण्यासाठी आपल्याकडे एक स्मार्टफोन आणि इंटरनेट असणे आवश्यक आहे आणि तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते तपशील देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
4. मी अर्ज कसा करू शकते?
ॲप डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही आपला मोबाईल नंबर नोंदवून आणि ओटीपी टाकून नोंदणी करू शकता नोंदणी झाल्यावर आपण “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप्सचे अनुसरण करू शकता.
अर्ज करताना मला कोणती माहिती द्यावी लागेल?
आपल्याला वैयक्तिक माहिती, जसे की आपले नाव, जन्म तारीख, पत्ता आणि संपर्क माहिती द्यावी लागेल. आपल्याला आपले शिक्षण, उत्पन्न आणि वैवाहिक स्थिती यासह आर्थिक माहिती देखील द्यावी लागेल.
मला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील?
आपल्याला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि आपला फोटो यासह कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
7. अर्ज सबमिट केल्यानंतर काय होईल?
आपला अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची छाननी केली जाईल. जर आपण पात्र असाल, तर आपल्याला योजनांचा लाभ मिळेल.
8. मला माझ्या अर्जाची स्थिती कशी कळेल?
आपण ॲपमध्ये किंवा Nari Shakti Doot वेबसाइटवर आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
9. मला मदत हवी असल्यास मी कुठे संपर्क साधू शकते?
आपल्याला Nari Shakti Doot हेल्पलाइन नंबरवर कॉल करून किंवा वेबसाइटवरून संपर्क साधून मदत मिळू शकते.
10. काही सामान्य त्रुटी आणि त्यांचे निराकरण काय आहे?
काही त्रुटी येत असल्यास योग्य मोबाइल नंबर टाकल्याची खात्री करा आणि ओटीपी पुन्हा मिळवा.