नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत 36 विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी,परिचारीका (महिला), परिचारीका (पुरुष), आणि बहुउद्देशीय कर्मचारी यांचा समावेश आहे. या पदभरतीसाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे व अर्ज करण्यासाठी कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
बारावी सायन्स असलेले उमेदवार पात्र:
अर्ज करण्यासाठी तुमच्या शिक्षणामध्ये MBBS/BAMS, B.Sc (नर्सिंग) किंवा 12वी (सायन्स) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स आवश्यक आहे. पद भरतीसाठी अर्ज करायची शेवटची तारीख सात सप्टेंबर 2024 असून अर्ज ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचा तसेच या पदभरतीची जाहिरातही काळजीपूर्वक वाचा आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका.
Thane Municipal Corporation Recruitment 2024:
🔴 Thane Municipal Corporation Recruitment 2024 साठी विविध पदांची भरती.
🔴 Total Posts: 36
🔴 पदे:
– Medical Officer: 12
– Staff Nurse (Female): 11
– Staff Nurse (Male): 01
– Multipurpose Staff (MPW): 12
🔴 शैक्षणिक पात्रता :
– Medical Officer: MBBS/BAMS
– Staff Nurse (Female & Male): B.Sc (Nursing)
– Multipurpose Staff (MPW): 12वी (Science) + Paramedical Basic Training Course किंवा Sanitary Inspector Course
🔴 वयोमर्यादा:
– Medical Officer: 18 ते 70 वर्षे
– Staff Nurse (Female & Male), Multipurpose Staff: 18 ते 65 वर्षे
🔴 नोकरी ठिकाण: ठाणे
🔴 अर्ज फी: नाही
🔴 अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024
हे पण वाचा:
12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार लगेच करा अर्ज!
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत एकूण 394 जागांसाठी होणार नवीन भरती!!